Monday, June 10, 2019

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास स्पॉट

😍 *पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास स्पॉट*

💁‍♂ पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडता ऋतू. पावसाळा म्हणलं कि सगळ्यांचंच मन पावसाळी पिकनिक करण्यासाठी हट्ट धरत असतं. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे काही खास पिकनिक स्पॉट...

--------------------

▪ *भंडारदरा* :अहमदनगरमधील अकोला तालुक्यातील भंडारदरा हा भाग  पावसाळ्यात अतिशय नयनरम्य असतो. घाटाच्या दोन्ही बाजूने अवाढव्य दरडी, त्यातून झुळुझुळू वाहणारे धबधबे, गार वारा आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा हे  वैशिष्ठय.
       हे ठिकाण पावसाळी पिकनिकसाठी एक हटके स्पॉट आहे.येथील विल्सन डॅम आणि आर्थूर लेक ही ठिकाणे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. दरवर्षी पावसाळ्यात येथे काजवा महोत्सव भरतो.

*रतनवाडी* : अहमदनगरमधील रतनवाडी हे भंडारदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. रतनवाडीला रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. तुम्ही जर ट्रेकिंगचे शौकीन असाल तर आपण नक्की भेट द्या.

▪ *घाटघर* : अहमदनगर येथील अकोल्यातील घाटघर म्हणजे ओलेचिंब होण्यासाठीचे सुयोग्य ठिकाण. घाटघर येथे दरवर्षी पावसाळ्यात 5000 मीमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. हिरवीगार झाडे, अवाढव्य डोंगर, मोठा जलविद्युत प्रकल्प ही घाटघरची ओळख.


▪ *कळसुबाई* : जर तुम्हाला पावसाळ्यात दाट हिरव्यागार झाडीतून पावसात भिजत ट्रेकिंग करावं वाटत असेल तर कळसुबाई हे ठिकाण तुमच्यासाठीच बनलेले आहे. कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.


Regards,
*SaiGunjan Travels & Tour Holiday*
*Office Address*
Pune,Shirdi, Rahuri, Ahmednagar
📞 7038864797-9975797287
      8888184797-8888184767
📧 *saigunjan2009@gmail.com*
      *saigunjantt614@gmail.com*
👉 WhatsUp:-
https://wa.me/918888184797
👉Like and follow Facebook page:-
Visit now :-



चला भटकंती करायला

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास स्पॉट

😍 *पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास स्पॉट* 💁‍♂ पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडता ऋतू. पावसाळा म्हणलं कि सगळ्यांचंच मन पावसाळी पिकनि...